मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ संघाचा पराभव केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आज लखनऊचा संघ तो पराभवाचा वचपा काढण्यासाठीच मैदानात उतरेल. लखनऊ संघाला मागील चुका सुधराव्या लागतील. लखनऊकडे सध्याचा ऑरेंज कॅप धारक खेळाडू आहेच आणि त्याला साथ द्यायला मिचेल मार्श, मार्करम आहेतच. ऋषभ पंतला आपल्या गोलंदाजाचा शेवटच्या षटकात योग्य वापर करावा लागेल. तिथे त्याचा कर्णधार पदाचा अनुभव कमी पडतो. तसेच ऋषभला त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल कारण त्याच्या लवकर बाद होण्यामुळे संघाच्या एकूण धावसंख्येवर परिणाम होतो.
डेव्हिड मिलरचा या हंगामात संघाला फार काही उपयोग झाला नाही. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची जी ख्याती आहे ती पाहावयास मिळाली नाही. दिल्लीचा संघ एक फायटर म्हणून या हंगामात खेळतो आहे. त्यांची जिंकण्यांची धडपड प्रत्येक सामन्यात पाहायला मिळते. या अगोदरच्या सामन्यात त्यांचा गुजरातने सहज पराभव केला त्यामुळे आज ते जिंकण्याच्या दृष्टीनेच खेळतील. प्रसिद्ध कृष्णनच्या आक्रमक गोलंदाजी पुढे दिल्लीचा टिकाव लागला नाही परंतु शेवट पर्यंत त्यांनी धीर सोडला नाही व २०० चा आकडा पार केला. आजही त्यांचा पर्यत्न हाच असेल की मोठी धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा किवा प्रथम गोलंदाजी आली तर समोरच्या संघाला जास्त धावा करू द्यायच्या नाहीत.
सध्या दिवसेंदिवस आयपीएल २०२५ रोमांचकारिक होत चालली आहे त्यामुळे अंदाज बांधण अवघड आहे तरीही आपण आशा करू की आज आपल्याला एक नवीन विक्रम पाहवयाला मिळेल
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…