कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, २०२५ यांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.


केंद्र सरकारने १९९९ मध्ये माजी कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नियुक्त केला होता. या आयोगाने सर्व २९ कामगार कायदे एकत्रित करून केवळ चार कामगार संहिता तयार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार केंद्राने चार संहिता तयार केल्या आहेत. त्यामध्ये वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता यांचा समावेश आहे. या चार संहिताचे अधिनियम संसदेनेही मंजूर केले आहेत.


कामगार हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत. केंद्राने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयारी केली आहे. या संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावी लागणार आहे. त्यासाठी राज्यांना संबंधित संहितांच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार करावे लागणार आहेत. त्यानुसार राज्याच्या कामगार विभागाने महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, २०२५ तयार केले होते. या नियमांना विधी व न्याय विभागाने काही सुधारणांसह मान्यता दिल्याने या नियमांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या नियमांचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.

Comments
Add Comment

माजी मंत्री आणि भाजप नेते राज पुरोहित यांचे मुंबईत निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते राज पुरोहित यांचे मुंबईत शनिवारी रात्री निधन झाले. ते ७० वर्षांचे

मानखुर्दमधून समाजवादी पक्षाचा सफाया, उबाठाला लोकसभेत दिलेला पाठिंबा पडला भारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द विधानसभा क्षेत्रामध्ये समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत उबाठा काँग्रेससह

मुंबई महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवीन चेहरे

तब्बल ११७ प्रथमच आले निवडून, केवळ १०० अनुभवी नगरसेवक मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई महापालिकेत पुन्हा महिलांचाच आवाज, १३० नगरसेविका आल्या निवडून

मुबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारल्याचे दिसून येत असून या

तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार