Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

  49

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.


बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफला जीवे (Tiger Shroff Death Threat) मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे.



खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीची ओळख


मुंबईतील खार पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीचे नाव मनीष कुमार सुजिंदर सिंग असे आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने खोटा दावा केला होता की टायगर श्रॉफला मारण्यासाठी काही लोकांना २ लाख रुपये आणि शस्त्रे देण्यात आली होती.



पोलिसांना देण्यात आली चुकीची माहिती


पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आरोपींनी पोलिसांना फोन करून माहिती दिली की सुरक्षा एजन्सीशी संबंधित काही लोक टायगर श्रॉफला मारण्याचा कट रचत आहेत. पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले की ही फक्त एक अफवा होती आणि सिंग यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली होती.



खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल


मुंबई पोलिसांनी सिंहविरुद्ध खारमध्ये गुन्हा दाखल करून, पंजाब पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्या माणसाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मुंबईत आणले जात आहे.



टायगर श्रॉफ 'बागी ४' च्या चित्रीकरणात व्यस्त


सध्या टायगर श्रॉफ 'बागी ४' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए हर्ष करीत आहेत.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची