नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आयात शुल्क धोरण जाहीर केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.
भारत आणि अमेरिका चर्चेतून दोन्ही देशांचे हित साधणारा नवा व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. यामुळे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या दौऱ्यात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
भारत दौऱ्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यावेळी प्रामुख्याने अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू-राजकीय संबंधांवर चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यानंतर उपाध्यक्ष जेडी व्हान्स २२ एप्रिल रोजी जयपूर आणि २३ एप्रिल रोजी आग्रा येथे भेट देणार आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या १९० अब्ज डॉलर एवढा मोठा व्यापार आहे. हा व्यापार वाढवणे आणि व्यापारातून दोन्ही देशांचे जास्तीत जास्त हित साधणे यासाठी नव्याने काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचा प्रयत्न २०३० पर्यंत व्यापार ५०० अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचा आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प आणि मोदी यांच्यात वैयक्तिक मैत्री निर्माण झाली. यातून पुढे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…