राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय! भारताची बदनामी कुणाच्या अजेंड्यावर?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात


मुंबई : “राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने परदेशात जाऊन भारताची, लोकशाही संस्था आणि संविधानाची बदनामी करत आहेत. निवडणुकीत सातत्याने पराभूत झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय,” अशी थेट टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.


फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर कोणी परदेशात जाऊन देशाचं नाव खराब करत असेल, तर तो कोणाचा अजेंडा राबवतोय, हा संशय निर्माण होतो. त्यांना पराभव पचलेला नाही, म्हणून राहुल गांधी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. हा केवळ बालिशपणा आहे.”



ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींनी देशात राहून काम करावं, जनतेत विश्वासार्हता निर्माण करावी. परदेशात फिरून भारताची निंदा करून मते मिळणार नाहीत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली,  कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. आता तरी त्यांनी भारताची बदनामी करणं थांबवावं.”



दरम्यान, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं, “राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. जे भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू शकले नाहीत, तेच लोक परदेशातून भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उभे करत आहेत. जॉर्ज सोरोसच्या अजेंड्यावर राहुल गांधी काम करतायत का?”

Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.