Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम 'शालू'ने धर्म बदलून केला 'या' धर्माचा स्वीकार!

  185

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा चित्रपट खूप गाजला होता. 'फॅण्ड्री' या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat) ला खूप लोकप्रियता मिळाली. आजही प्रेक्षक किंवा चाहते राजेश्वरीला जब्याची शालू म्हणून ओळखतात. चित्रपटानंतरही राजेश्वरी ग्लॅमरस फोटोंमुळे आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. कधी कधी चित्रपटांमध्ये दिसणारे कलाकार प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांवर बरेचदा प्रभाव टाकत असतात. आपला आवडता कलाकार जसं करेल तसंच आपण सुद्धा अनुकरण करायचं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळेच प्रेक्षक कलाकारांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलो करत असतात. अशातच लोकप्रिय आणि 'फॅण्ड्री' चित्रपटामधली शालू म्हणजेचं राजेश्वरी खरात एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं सांगितलं आहे.


नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'फॅन्ड्री' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातबाबत एक खळबळ जनक माहिती समोर आली आहे. फॅन्ड्री मधून राजेश्वरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर सुद्धा ती बऱ्याच प्रोजेक्टमध्ये दिसलेली. राजेश्वरी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. जे बरेचदा चर्चेचा विषय देखील बनतात. पण आता राजेश्वरीची एका भलत्याच कारणामुळे चर्चा चालू असून चाहते ही तिच्यावर नाराज आहे.





अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी आहे. तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, बाप्तिस्मा स्वीकारलं. याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे. या फोटोतून स्पष्ट होतंय की, अभिनेत्रीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



चाहत्यांची नाराजी


राजेश्वरीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एका नेटकरी युजरने लिहिलंय की, ख्रिश्चिन धर्मापेक्षा ही प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धर्म असताना दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? बाबासाहेबांनी तब्बल २५ वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धर्म दिला तो असेच नव्हे..! तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे जे स्वाभिमानी असतात. दुसऱ्या एकाने लिहिले की, काळी चिमणी घालवली लगा..... बऱ्याच लोकांनी अनफॉलो अशी कमेंट केली आहे. तर एकाने 'कदाचित शूटिंग आहे, लई लोड घेऊ नका... चर्चेत येण्यासाठो केलेला एक निरागस स्टंट वाटतोय.. बाकी काही नाही असा विश्वाससुद्धा दाखवला आहे.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा