Female Police Officer Ashwini Bidre : कधी काळी राष्ट्रपतींकडून कौतुक करुन घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप, महिला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी शिक्षा

  98

मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार आहे. न्याय सर्वांना समान आहे. कायदा हाती घेतला तर शिक्षा ही होणारच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हिची २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अश्विनी बिद्रे यांचा लिव्ह इन पार्टनर, अभय कुरंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पोलीस अधिकारी असूनही अश्विनी यांची हत्या झाल्याचे अनेक दिवस समजले नव्हते. अभय कुरंदकर पोलिसांना आणि अश्विनी यांच्या कुटुंबियांना अंधारात ठेवण्यात यशस्वी झाला होता. पण अखेर सत्य उजेडात आलं. यानंतर आता अभय कुरंदकरला हत्येप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्याचे सहकारी कुदंन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अश्विनीच्या नातलगांना पहिल्यांदा न्याय झाल्यासारखं वाटलं.


महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे ही लिव्ह इन पार्टनर अभय कुरंदकर सोबत एकत्र राहत होती. त्यांच्यात झालेल्या वादाला कंटाळून नराधम अभय कुरंदकरने अश्विनी बिद्रेची हत्या केली. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले. या गुन्ह्याची कबुली अभय कुरंदकरने दिल्यानंतर या कटात सामील असलेल्या त्याच्या साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. अश्विनी यांच्या कुटुंबाचा लढा अखेर आज यशस्वी झाला. पनवेल सत्र न्यायालयाने आजच्या सुनावणीत अभय कुरंदकरला अश्विनीची हत्या करणे, तिच्या शरीराचे तुकडे करणे, आणि पुरावे नष्ट करून खून लपवण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.



काय आहे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण ?


अभय कुरुंदकर हे मुंबई पोलिसांत अधिकारी होते. त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं होतं. कुरुंदकर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अश्विनी बिद्रेच्या प्रेमात पडले. पण २००५ साली अश्विनी बिद्रेचं लग्न राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने महाराष्ट्र पीएससी उत्तीर्ण केली आणि पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाली. तिचं पहिलं पोस्टिंग पुण्यात झालं. तीन वर्षांनंतर, अश्विनीची सांगलीला बदली झाली.


अश्विनीची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी अवघ्या ६ वर्षांची होती. अश्विनीची पोस्टिंग रत्नागिरी येथे २०१३ मध्ये झाली. कुरुंदकरचे लग्न झालेले असूनसुद्धा तो अश्विनीसोबत लिव-इन पार्टनर म्हणून राहत होता. दोघांच्याही घरी याची कल्पना होती. अश्विनी २०१४ मध्ये तिच्या पतीपासून वेगळी झाली. मात्र अभयच्या घरी या घडामोडीची माहिती नव्हती.


अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. अश्विनीला २०१५ मध्ये बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. बढती झाल्यानंतर ती ११ एप्रिल २०१६ रोजी बेपत्ता झाली. अश्विनीच्या भावाला आनंदला १५ एप्रिल रोजी फोनवर मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला जात आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईल. मेसेज आल्यामुळे अश्विनीच्या घरचे निवांत होते. मात्र एक दिवस अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून मोबाईलवर फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली.


अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही, असे त्यांना सांगण्यात आलं. पण कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. यानंतर अश्विनीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अभय आणि अश्विनी यांच्या नात्याबद्दल स्पष्टता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. काही दिवसांनी तपासादरम्यान पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसला होता. तब्बल १० महिन्यांच्या तपासानंतर अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली.


अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले असल्याचं कबुल केलं. या घटनेनंतर अश्विनीच्या कुटुंबाने आणि तिच्या मुलीने आईला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. तब्बल ९ वर्षांनी न्यायालयीन लढाईत त्यांना यश मिळालं आहे. अश्विनीच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पनवेल न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली