Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील

मेष : हा आठवडा आपल्याला अनुकूल स्वरूपाचा जाईल. आपल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धि करणारा ठरेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. व्यवसाय- धंद्यामध्ये नवीन योजना तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद टाळा. व्यवसायाचे हित लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही क्लिष्ट समस्या आपण सोडवू शकाल. वरिष्ठांबरोबर असलेले संबंध सुधारतील. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. प्रवासाचे योग आहेत. काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होईल. आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील. व्यावहारिक उलाढालीमध्ये आर्थिक लाभ होतील.

नवीन करारमदार करू शकाल

वृषभ : या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. इतरत्र वेळ वाया न घालवता कार्यमग्न राहणे महत्त्वाचे ठरेल. आलेल्या नवीन संधीमुळे आपले रोजचे जीवन बदलू शकते. प्रगती उन्नती करू शकाल. आर्थिक बाजू भक्कम राहिल्याने आपल्या मनातील नियोजन आपण प्रत्यक्षात आणू शकाल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. नवीन करारमदार करू शकाल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून योग्य कालावधी आहे. नवीन संकल्पनांचा वापर फायदेशीर ठरेल. भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाचे करू शकते. नोकरीमधील वातावरण सर्वसामान्य राहील.

हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल

मिथुन : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक उद्भवलेल्या समस्या शांतपणे व प्रयत्नाद्वारे सोडवू शकाल. इतरांची मदत मिळेल. इतरांशी सौजन्याने व विनयशीलतेने वागण्याची गरज आहे. व्यवसाय-धंद्यात काही वेळेस आर्थिक गरज निर्माण होऊ शकते. कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहा. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच शत्रू व हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहा. आपल्या ध्येयाच्या पाठपुराव्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल.

महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन

कर्क : दीर्घकाळ रखडलेली अथवा प्रलंबित राहिलेले जमिनीचे तसेच स्थायी मालमत्तेचे व्यवहार गतिशील होऊन त्याचा पूर्णत्वाकडे प्रवास होईल. समाजातील काही मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल. मित्रमंडळींच्या परिवारातून मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील मात्र प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मन शांत ठेवून दृढ निश्चयाने निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कार्याचा ठसा उमटविण्यात यश

सिंह :आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही अनपेक्षितरीत्या संधी मिळू शकतात. कामात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उपयोगी कालावधी. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यश मिळेल. कुटुंब परिवार तसेच आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे आपल्या समोरील कामे सहज होतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवास सुखकर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धिचे योग आहेत.

सतर्क राहणे आवश्यक

कन्या : सध्याचा कालावधी अनुकूल असला तरी काही बाबतीत आपल्याला सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. उलाढाल वाढेल परंतु जबाबदाऱ्या व खर्चही त्याच प्रमाणात वाढल्याने गोंधळून जाण्याची शक्यता. व्यवसायिक समस्या शांतपणे विचार करून मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात भागीदारामुळे प्रश्न संपुष्टात येतील. आर्थिक मदत मिळू शकते.

रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक

तूळ : भाग्याची साथ मिळाल्यामुळे रखडलेली किंवा अर्धवट अवस्थेतील असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय-धंद्यात अपुरे राहिलेले प्रोजेक्ट आता पूर्ण होतील. पण प्रयत्न मात्र त्यादृष्टीने केल्यास त्यात यश मिळेल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास आपली कामे आपण पूर्ण करू शकाल. वेळेचा अपव्यय व आळस टाळणे हितकारक ठरेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. दूरचा प्रवास घडू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

आपल्याला पाठिंबा मिळेल

वृश्चिक : आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्याने पुढील कामे करण्यात उत्साह राहील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हाती घ्यावेसे वाटेल. तसेच त्या दृष्टिकोनातून नवे नियोजनही कराल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून काही नवीन बदल करण्याचे ठरवाल. हे नवीन प्रकारचे बदल आपल्या व्यवसायासाठी पोषक ठरतील. कुटुंब परिवारातून आपल्याला पाठिंबा मिळेल. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल होतील.

आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल

धनू : आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठराल. एखादी महत्त्वाची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. परदेशगमनाचे योग आहेत. त्याचा फायदा पण होईल. आर्थिक परिस्थिती उंचावेल. जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो.

सहकार्य मिळत राहील

मकर : सदरील काळामध्ये कधी चांगले, तर कधी गोड अनुभव येतील. दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल; परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये समस्या तसेच विलंब होऊ शकतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. आपला राग कुटुंबीयांवर काढू नका. स्वतः आपल्या कार्यामध्ये प्रयत्नशील व कार्यरत राहिल्यास यश आपलेच आहे हे लक्षात ठेवा. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. खर्चात वाढ होऊ शकते. काही खर्च अचानक करावे लागतील. घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन चकित करू शकते. कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम करण्याचे नियोजन होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील.

अध्यात्मिकतेमध्ये प्रगती करू शकाल

कुंभ :आपण कार्य करीत असलेल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. नवीन नवीन संधी चालून येतील. आळस झटका. नोकरीमध्ये ज्या जातकांची प्रगती अथवा पदोन्नती थांबल्यासारखी झाली होती अशांची प्रगती होऊन पदोन्नती वेतन वृद्धी होईल. या काळात आपल्या बुद्धी कौशल्याचा तसेच वाणीचा प्रभाव दिसेल. जीवनातील अपेक्षित सेवा सुविधा मिळतील. कुटुंब परिवारातून सर्व सदस्यांचे वाढते सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. धार्मिक सामाजिक क्षेत्रात आपली रुची वाढेल. हातून दानधर्म होण्याची शक्यता. धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे योग. गूढ विद्येविषयी उत्कंठा दाटून येईल. अध्यात्मिकतेमध्ये प्रगती करू शकाल. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधाल.

कार्य पूर्ततेचा आनंद मिळेल

मीन :आपल्या आजूबाजूस अनुकूलतेचे प्रमाण वाढलेले आपल्याला अनुभवता येईल. थोड्याच प्रयत्नांनी दैनंदिन कामे होत असलेली बघून आत्मविश्वास बळावेल. नवीन कामे हाती घ्याल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नवीन नियोजन करू शकाल. एखादे महत्त्वाचे काम बरेच दिवस होण्याची वाट आपण बघत होता ते काम झाल्यामुळे इच्छापूर्तीचा आनंद घेऊ शकाल. कार्य पूर्ततेचा आनंद मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश मिळून अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. कुटुंबातून जीवनसाथीची साथ आपल्याला मिळेल. कुटुंबातील मुलींकडून यशदायक वार्ता कानी आल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

8 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

40 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

1 hour ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

5 hours ago