Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर तो प्रेक्षकांना एकदम मिळमिळीत वाटतो. चित्रपटांतील काही गाणी लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करणारी असतात. पण एक गाणे असेही आहे की ते ऐकून कित्येकांनी आत्महत्या केली आहे. या गाण्यावर ६२ वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी काढून टाकण्यात आली आहे.

चित्रपट कोणत्याही भारतीय भाषेतील असो त्यातील गाणी ही त्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतात. कारण गाणी ही कोणत्याही चित्रपटाचा प्राण असतात. काही चित्रपट तर फक्त गाण्यावरच हिट होतात. अनेकदा नागरिक त्यांच्या भावना व्यक्त करताना गाण्यांचाच वापर करतात. यामुळेच भारतात गाण्यांच्या स्पर्धा, अंताक्षरी (गाण्यांच्या भेंड्या) असे कार्यक्रम लोकप्रिय होतात. गाणी अनेकांना त्यांच्या मूड प्रमाणे ऐकायला आणि गुणगुणायला आवडतात. प्रत्येक प्रकारातील गाणी पसंतीस उतरणारीच असतात.ही गाणी नवी ऊर्जा देतात. दुःखी, रोमँटिक, आकर्षक आणि देशभक्तीपर गाणी लोकांना वेगवेगळ्या ऊर्जा अनुभवायला लावतात.

काही गाणी अशी असतात जी लोकांना एखाद्याची आठवण करून देतात आणि त्यांच्या जखमा भरून काढतात. तर, काही गाणी अशी असतात जी वेदना कमी करतात. प्रत्येकाची गाण्यांबाबत आवड ही वेगळी असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक गाणं असं आहे ज्याने अनेकांना दु:खच दिलं आहे. या गाण्याला जगातील सर्वात दुर्दैवी गाणं असल्याचं म्हटलं आहे. या गाण्याने चक्क काही शे जणांचे प्राण घेतलेत.


हे गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे


हे गाणे असे आहे की ते ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करायचे. हाऊस स्टफ वर्क वेबसाइटनुसार, ‘ग्लूमी संडे’ हे गाणे जगातील सर्वात दुर्दैवी गाणे आहे. हे गाणे रेज्सो सेरेस आणि लैजलो यांनी लिहिले आहे. हे गाणे १९३३ मध्ये लिहिण्यात आले आणि १९३५ मध्ये प्रदर्शित झाले. गाणे ऐकल्यानंतर एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना १९३५ मध्येच घडली. इथूनच या गाण्याचा आणि आत्महत्यांचा असा विचित्र बंध निर्माण झाला... त्या आत्महत्या करणाऱ्याने चिठ्ठीत ऐकलेल्या गाण्याचा उल्लेख केला होता. नंतर हे गाणे संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकाराच्या प्रेयसीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. गाण्याचे गीतकार रेज्सो यांनी १९६८ मध्ये आत्महत्या केली. गाणे ऐकल्यानंतर दोन जणांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि एका महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या सगळ्या घटनांनंतर, या गाण्यावर अखेर बंदी घालण्यात आली.

एक ‘हंगेरियन’ गाणे


जेव्हा या गाण्याचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळून आले की ते एक ‘हंगेरियन’ गाणे आहे. ज्या वेळी हे गाणे रिलीज झाले तेव्हा हंगेरीतील बहुतेक लोक तणावाने ग्रस्त होते. लोक आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमधून काढून टाकले जात होते. अशा परिस्थितीत, या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण त्याच्या आयुष्याशी जुळू लागले आणि यामुळे त्या लोकांना आणखी दुःख झाले. हे गाणे मानवतेबद्दल, जीवनातील कठीण परिस्थिती, त्यात गुंतलेल्या दैनंदिन दुःखांबद्दल आणि मृत्यूबद्दल आहे. त्यामुळे या गाण्याचा एवढा परिणाम झाला की हे गाणे ऐकून त्यावेळी लोकांनी आत्महत्या केल्या.
Comments
Add Comment

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला