मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी लांबीची जलवाहिनी फुटली. परिणामी शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमर महल जंक्शनजवळ सुरू असलेल्या मेट्रो बांधकामामुळे १२०० मिमी लांबीची पाण्याची जलवाहिनी फुटली.
महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान त्याच ठिकाणी असलेली १८०० मिमी लांबीची मुख्य जलवाहिनी तात्पुरती बंद करण्यात आली. परिणामी, चेंबूर, शिवाजी नगर, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, सायन, वडाळा आणि परळ या भागांतील पाणीपुरवठा खंडीत झाला. चेंबूर: वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, कॉलनी पोस्ट, एस. टी. रोड, सी.जी. गिडवाणी रोड, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर मार्केट, वाशी गाव, भक्ती पार्क, अंबापाडा, माहुल गाव, म्हाडा बिल्डिंग, म्हैसूर कॉलनी, जिजामाता नगर, माहुल रोड, एम. एस. इमारती, राम टेकडी, सिंधी सोसायटी, चेंबूर कॉलनी, कलेक्टर कॉलनी, मारवली चर्च, नवजीवन सोसायटी, बसंत पार्क, छेडा नगर, छेडा गाव, गोल्फ क्लब, व्ही. एन. पुरव मार्ग, आर.सी. मार्ग.
एम-पूर्व विभाग गोवंडी अहिल्याचाई होळकर मार्ग, रफिक नगर, वाचा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, ९० फूट रोड सेक्टर १३, १४, १५, मंडाळा, २० फूट आणि ३० फूट रस्ते, एकता नगर, म्हाडाच्या इमारती: कमलरामन नगर, बैंगणवाडी रोड १०-१३, आदर्श नगर; रमण मामा नगर, शिवाजी नगर रस्ते ०६-१०, शास्त्री नगर, चर्च रोड, संजय नगर भाग-२: शिवाजी नगर रस्ते ०१-०६, जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, गौतम नगर, गोवंडी स्टेशन रोड, दत्त नगर, देवनार बीएमसी कॉलनी, साठे नगर, झाकीर हुसेन नगर, लल्लूभाई म्हाडा इमारती; जनकल्याण सोसापटी, मानखुर्द, पीएमजीपी कॉलनी, डॉ. अबिडकर नगर, जेने रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), महाराष्ट्र नगर; देवनार फार्म रोड, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी.
एन विभाग घाटकोपर राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, एम.जी. रोड, पंतनगर, नवीन पंतनगर, विक्रांत सर्कल, पटेल चौक, आंबेडकर सर्कल, ९० फूट रोड, लक्ष्मी नगर, लक्ष्मीबाग, गरोडिया नगर, नामडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, खोत गल्ली, नवरोजी गल्ली, एचआर देसाई मार्ग, जेव्ही रोड, ध्रुवराजसिंग गल्ली, गोपाळ गल्ली, जीवनदया गल्ली, गिगावडी, भीमनगर, भीमनगर, लोवरनगर, सी. परिसर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट रोड, N.S.S. रोड, महिंद्रा पार्क, डी.एस. पथ. ब.५० एल विभाग कुर्ला नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नेहरू नगर (कुर्ता पूर्व), मदर डेअरी रोड, कसाईवाडा, चुनाभट्टी परिसर, राहुल नगर, एकरर्ड नगर, शिक्सृष्टी मार्ग, नाईक नगर, एसजी बर्वे मार्ग, केदार नाथ मंदिर, पोलीस नगर रोड, कर्नल नगर, हंगणनगर रोड साबळे नगर, संतोषी माता नगर,
एफ उत्तर विभाग दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टी परिसर, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्माडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोहा बिल्डिंग्ज (न्यू कफ परेड), सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के.डी. गायकवाड नगर, कोरची मिठागर, एफ दक्षिण विभाग केईएम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, बाई नेरबाई वाडिया हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, शिवडी (पूर्व) क्षेत्र शिवडी किल्ला रोड, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा, शिवडी (पश्चिम) क्षेत्र आचार्म दोंडी मार्ग, टी.जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेड मार्ग, गोलंजी इनपुट, परळ गाव पंप झोन जोडी आंबेडकर मार्ग (५० फ्लॅट्सपर्यंत), आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…