MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे चेन्नईला फायदा झाला. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे जे फलंदाजीला उपयुक्त आहे.


चेन्नई व मुंबई हे दोन्ही संघ ह्या हंगामात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दोन्ही संघ अगोदरचा सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे व आता सर्वच संघात जिंकण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबईचा सलामीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, अजूनही हिटमॅन रोहित शर्मा संघाला एक आश्वासक सुरवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.


मधल्या फळीत विल जैक्सच्या रूपाने अजून एक फलंदाज मुंबईच्या संघात सामील झाला आहे त्यामुळे मुंबईसाठी ती एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहचे आगमन मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण शेवटच्या षटकात बोल्ट व पंड्या तेवढा प्रभावी ठरत नाही. चेन्नईच्या बाबतीत फलंदाजीमध्ये अजूनही हा संघ चाचपडताना दिसतो आहे. धोनीचे नेतृत्व फलंदाजीमध्ये कमी पडते आहे, तसेच शेवटच्या षटकात हाणामारी करण्यासाठी त्यांच्याकडे हीटरची कमतरता आहे. चला तर बघूया हार्दिक पंड्याचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का?

Comments
Add Comment

IND vs ZIM : पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा विजय, मयंक यादवच्या वेगासमोर झिम्बाब्वे ढेर!

वेगवान गोलंदाज मयंक यादवची (Mayank Yadav) भेदक गोलंदाजी आणि सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) अवघ्या १८ चेंडूंतील

Lovlina Borgohain : भारताचा विजयी श्रीगणेशा; लव्हलिना बोरगोहेनमुळे पहिले पदक निश्चित

स्कॉटलंड : स्कॉटलंडमधील (Scotland) ग्लासगो येथे सुरू झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने

CWG 2026 : डोपिंगमुळे भारतीय ज्युडोपटू अरुण कुमार स्पर्धेबाहेर, भारताला मोठा धक्का

CWG 2026 :  कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ सुरू होताच भारतीय पथकाला (Indian contingent) मोठा धक्का बसला आहे. ज्युडो (Judo) खेळाडू अरुण

IND vs ZIM 1st T20 Vaibhav Suryavanshi : १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची जगभर चर्चा! १८ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम

- झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत तुफानी खेळी; सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा

WTC Final 2027 चे वेळापत्रक जाहीर! 'द ओव्हल'वर रंगणार अंतिम सामना; गुणतालिकेत भारताची घसरण

- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर मुंबई : जागतिक

Commonwealth Games 2026 : उद्घाटनापूर्वीच लव्हलिना बोरगोहेनमुळे भारताचे पहिले पदक निश्चित!

CWG2026 : ग्लास्गो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) च्या औपचारिक उद्घाटनापूर्वीच भारताने आपल्या