Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

  87

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे याच एक मोठं स्वप्न आज पूर्ण झालं.त्याने आलिशान कार घेतील आहे. किंमत बघूनच लोकांना आश्चर्य वाटेल एवढी महागडी कार त्याने घेतली आहे. गौरवने त्याचे कारसोबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

गौरव मोरेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे. एका शो मुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने फक्त शो नाही तर मराठी चित्रपटात काम सुद्धा केलं आहे. त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर लोकांमध्ये आपली क्रेझ निर्माण केली आहे. गौरवने मराठीतच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. गौरवने शून्यातून आपलं यशाचं जग तयार केलं आहे.इथपर्यंत पोहोचायला त्याने घेतलेली मेहनत सर्वांनी पाहिली आहे.

गौरवने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. त्याचं एक आलिशन कार घेण्याचं स्वप्न होत.ते त्याने आज पूर्ण केलं. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. गौरवने स्क्वोडा कार विकत घेतली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. नवी कार घेतल्यानंतर गौरव मोरे खूपच आनंदात आहे. गौरवने Skoda Kushaq कारचा व्हिडीओ शेअर करत “फायनली नवीन गाडी घेतली…”, असं कॅप्शनही दिलं आहे.

अशी आहे गौरव मोरेची स्कोडा कार


Skoda Kushaq ही SUV 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिनसह येते. जी 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार सहा स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये ३८५ लिटर बूट स्पेस, ५० लिटर फ्युएल टँक आणि १७ किमी. प्रति लिटर मायलेज आहे.

गौरव मोरेच्या स्कोडा कारची किंमत


Skoda Kushaq ची किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी असते. पुण्यात या कारची ऑन-रोड किंमत १२.६६ लाखांपासून सुरू होते. गौरव मोरेने कोणते मॉडेल घेतले आहे हे अद्याप स्पष्ट नाही परंतु अंदाजे १२.५ लाख ते वीस लाखांदरम्यान ही कार असू शकते.

Comments
Add Comment

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर