Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर पडली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये, स्थानकात गर्दी कमी व्हावी यादृष्टीने मध्य रेल्वेने फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषित केल्या आहेत. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या व ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणीनुसार विविध मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रमुख टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००