मुंबई:‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये चांगली भूमिका बजावत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं बेर्डे यांच्या निधनाला आज अनेक वर्ष उलटली तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात अजून ही ते घर करून आहे. त्यांचे किस्से अजूनही लोक सांगत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकर चाहत्यांचा आणि सिनेविश्वाचा निरोप घेतला.
पण कलाकाराचा कधीच अंत होत नाही… असं म्हणतात ते अगदी खरं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आजही सिनेमे आणि काही व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये आहे. सोशल मीडियाच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये अजूनही ते आहेत असच अजून पण चाहत्यांना वाटत.
आता देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दिली आहे. एकदा अभिनेते शेखर सुमन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलाखत घेतली होती. त्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शेखर सुमन बेर्डे यांना विचारतात, ‘कधी कोणत्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर आकर्षित झालात का?’ यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, आकर्षित तर झालोय पण काय आपल्याला माहिती आहे ना मिळणारं नाही लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हाच विनोदी स्वभाव सगळ्यांनाच आवडतो. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आलं, ‘तुम्ही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. आता काही दुसरा काम करण्याची इच्छा आहे का? अभिनेता आहात तर आता नेता होण्याची इच्छा नाही होत का? यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, मला अजूनही सिनेमा मधेच काम सुरु ठेवायचं आहे. राजकारणाबद्दल विनोदी अंदाजामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, राजकारणात माझी गरज कशाला आहे. तिथे इतके विनोदवीर आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या उत्तरानंतर सगळे खुपच हसायला लागले. सध्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…