Nashik : नाशिकमध्ये हिंसा, ३८ अटकेत; MIM च्या शहराध्यक्षाला अटक आणि मविआचे पदाधिकारी फरार

Share

नाशिक : नाशिक – पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दर्ग्याच्या व्यवस्थापनाला कायद्यानुसार महापालिकेने नोटीस बजावली होती. पण महापालिकेने कारवाई सुरू करताच मुसलमानांनी घटनास्थळी जमून पोलिसांवर दगडफेक केली. कारवाईला विरोध करण्यासाठी दंगल करण्यात आली. पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या भागात दंगल झाली तिथे पोलीस बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दंगल प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी अल्पावधीत मोठा जमाव आला कसा आणि सतत हल्ले करण्यासाठी दगड आणि शस्त्रे आली कुठुन ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक केली आहे. काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.

नाशिकमधील हिंसेप्रकरणी १५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी यांचाही समावेश आहे. या आरोपींच्या विरोधात कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दर्ग्यावरील कारवाईला विरोध म्हणून पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये २१ पोलीस जखमी झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. दंगल करणाऱ्यांनी ३० वाहनांची नासधूस केली. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Recent Posts

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

1 hour ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

2 hours ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

2 hours ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

2 hours ago

Pune News : स्मार्ट पुण्यात बनावट कपड्यांचा सुळसुळाट!

पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…

3 hours ago

Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…

3 hours ago