RBI Action : ३ बड्या बँकांवर आरबीआयची धडक कारवाई! ग्राहकांवर होणार परिणाम?

  133

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे किंबा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांवर कारवाई करते. मागील महिन्यात आरबीआयने एचडीएफसीसह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर कारवाई केली होती. त्यानंतर आता आणखी ३ मोठ्या बँकांवर आरबीआयने धडक कारवाई केली (RBI Action) आहे. मात्र यामुळे खातेधारकांच्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? असा प्रश्न सामान्य खातेधारकांना पडत आहे.



आरबीआयने कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आरबीआयने तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही असे म्हटले आहे.


आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) 'कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली'चे निर्देश तसंच 'कर्ज आणि आगाऊ वैधानिक', इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला ६१.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, 'बँकांमधील ग्राहक सेवा' संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने पंजाब नॅशनल बँकेवर (PNB) २९.६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.



तसेच केवायसी (Know Your Customer - KYC) संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First Bank) आरबीआयनं ३८.६ लाखांचा दंड ठोठावला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांवर कारवाईचा बडगा उगारते. मात्र यावेळी खातेधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे