DC vs RR IPL 2025: स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानला दिला शॉक, १२ चेंडूत विजयाचा घास घेतला हिरावून

मुंबई: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बुधवारी रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सामन्यात प्रेक्षकांचा श्वास ऱोखून धरायला लावला होता.


आयपीएल चा ३२वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. हा सामना बरोबरीत सुटला. मात्र सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला. पाच सुपर ओव्हरमधील दिल्ली कॅपिटल्सचा हा चौथा विजय होता.दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो प्लेयर ऑफ दी मॅच स्टार्क ठरला. त्याने दबावात इतकी चांगली बॉलिंग केली यामुळे दिल्लीला बुधवारी राजस्थानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवता आला.


सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या स्टार्कने शेवटच्या षटकांत ९ धावांचा बचाव केला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. आधी खरंतर असे वाटत होते की राजस्थान रॉयल्सचच सामना जिंकेल.


ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने यानंतर सुपर ओव्हर टाकली. यात त्याने दोन चौकार दिले आणि दोन धावचितही केले. यामुळे राजस्थानला सुपर ओव्हरमध्ये केवळ ११ धावाच करता आल्या. तसेच दोन विकेट पडल्याने त्यांना ऑलआऊटही घोषित करण्यात आळे. यानंतर केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सने अनुक्रमे एक चौकार आणि एक षटकार लगावत दिल्लीला अरूण जेटली स्टेडियममध्ये पहिला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे