Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Cabinet expansion : माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

Cabinet expansion : माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?
नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच तामीळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष आणि माजी आयपीएस के. अण्णामलाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची उच्चस्तरिय बैठक झाली. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर वरिष्ठ नेते चर्चेसाठी उपस्थित होते. ही बैठक बराच काळ चालली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. देशासमोरचे प्रश्न, पक्षापुढील आव्हाने, कोणत्या समस्येला सोडवण्यासाठी कोणती व्यक्ती सक्षम आहे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली. चर्चेची जास्त माहिती बाहेर आलेली नाही. पण एरवी बुधवारी होत असलेली मंत्रिमंडळाची बैठक अचानक रद्द झाली. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे.
तामीळनाडू आणि बिहार या दोन राज्यांशी संबंधित निवडक नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विशेष कामगिरी न केलेल्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याचीही शक्यता आहे. वर्षभरात तामीळनाडू आणि बिहार या दोन मोठ्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना या मुद्याचा हमखास विचार होईल, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा