मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता साउथ इंडस्ट्रीत (South industry) पदार्पण करत असून, तो सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि नागार्जुन(Nagarjuna) यांच्यासोबत आगामी ‘कुली’(coolie) चित्रपटात झळकणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या चर्चेत असलेल्या ‘कुली’ या चित्रपटात आमिर खान एका छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याबाबत कन्नड अभिनेता उपेंद्र राव यांनी त्यांच्या ‘४५’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माहिती दिली. त्यांनी सांगितले, “आमिर खान हा देखील ‘कुली’चा भाग आहे. त्याची भूमिका लहान असली तरी प्रेक्षकांसाठी खास असेल.”
या बिग बजेट चित्रपटात रजनीकांत एका नकारात्मक भूमिकेत झळकणार आहेत, तर उपेंद्र राव मुख्य भूमिकेत दिसतील. याशिवाय चित्रपटात नागार्जुन, श्रुती हसन, सत्यराज आणि सौबिन शाहीर यांसारखे स्टार कलाकारही आहेत.
हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उपेंद्र म्हणाले, “मी या चित्रपटासाठी फक्त रजनीकांतमुळे होकार दिला. मी त्यांना द्रोणाचार्य मानतो आणि स्वतःला एकलव्य. त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.”
लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साउथच्या सुपरस्टार्ससोबत बॉलिवूडमधील आमिर खानच्या सहभागामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षकांसाठी ही एक मेजवानीच ठरणार यात शंका नाही!
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल २०२५ रोजी मेगाब्लॉक घेणार…
मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत…
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…