Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!

मुंबई : मुंबईत आजही चोरांचा सुळसुळाट कायम आहे. रात्री अपरात्री, गर्दीच्या ठिकाणी संधी साधून चोर सफाईने चोरी करून पलायन करतात. काहींना पकडण्यात यश येतं तर काही पोलिसांच्या हातून सहज निसटतात. बदलत्या तंत्रज्ञानामुळे अशा लुटारूंना पकडणे अधिक सोपे झाले आहे. मात्र काही लुटारू हे पकडले जाऊ नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर हल्ला देखील करतात. अशीच एक घटना मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस घडली. अंधारात संधी साधून एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून, त्याच्यावर हल्ला करून दोन लुटारुंनी दुचाकी आणि मोबाईल पळवला. या घटनेसंदर्भात तरुणाने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तपासादरम्यान कोणताही पुरावा हाती लागला नाही मात्र या तपासामध्ये एक महापालिकेची कचऱ्याची गाडी गेम चेंजर ठरली.



मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील भाबुदे ४ एप्रिल रोजी रात्री दुचाकीवरून पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रवास करत होता. प्रवासादरम्यान काही लुटारुंनी जाणूनबुजून धक्का मारून स्वप्नीलला थांबवले. त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. या घटनेची तक्रार स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र काळोख असल्याने पोलिसांना चोरांची ओळख पटली नाही. घडलेल्या प्रकाराने गोंधळल्याने स्वप्नील याला आरोपींची शरीरयष्टी व कपड्याबाबत काहीही सांगता येत नव्हते. पोलिसांनी तपास कौशल्य पणाला लावून वारंवार स्वप्नीलकडून माहिती जाणून घेतली. घटनेच्या वेळी बाजूने रस्त्यावरील कचरा साफ करणारी गाडी, छोटा टेम्पो, ट्रक व काही गाड्या गेल्याचे स्वप्नील सांगत होता. त्यानुसार, टोलनाक्यावरील फुटेजमधून कचरा साफ करणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळाला. या गाडीचा चालक आणि दोन कामगार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कचरा गाडीला कॅमेरा असल्याचे सांगितले. कचरा साफ करणाऱ्या गाडीवरील कॅमेऱ्यात मारहाण करणारे दोघे आणि त्यांच्याकडील दुचाकी दिसली. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ