अवघ्या अर्ध्या तासात मुंबईहून गाठता येणार ठाणे

पूर्व द्रुतगती मार्गावर १३.४ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू


मुंबई ( प्रतिनिधी): मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर (ईस्टर्न एक्सप्रेस हायवे) १३.४ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. हा रस्ता घाटकोपरमधील छेडा नगर ते मुलुंड पूर्वेतील आनंद नगरपर्यंत पसरलेला असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेला हा प्रकल्प ३,३१४ कोटी रुपये किमतीचा आहे. या उन्नत रस्त्याला प्रत्येक दिशेला तीन मार्गिका असतील, ज्यामुळे शहरातील सर्वात व्यस्त रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.


सध्या प्रारंभिक कामे सुरू असून, भू-तांत्रिक तपासणी आणि मध्यवर्ती अडथळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रक्रियेत जमिनीखाली खणून तिथल्या थरांचा अभ्यास केला जात आहे. हा उन्नत मार्ग पूर्व द्रुतगती मार्गावरील अडथळे, विशेषतः कांजुरमार्ग पूर्व ते मुलुंड टोल नाक्यापर्यंतच्या भागात, वाहतू कोंडी कमी करण्यास मदत करेल. छेडा नगर, कांजुरमार्ग, ऐरोली पूल आणि मुलुंड टोल नाका येथे प्रवेश आणि निर्गमन रॅम्पची योजना आखली गेली आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल.


प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पूर्व उपनगरांमधील प्रवास सुलभ होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. एमएमआरडीएने हा प्रकल्प २०२४ च्या अखेरीस कंत्राटदाराला दिला असून, डिसेंबर २०२८ पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंत्राटदारावर बांधकामानंतर दोन वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी देखील असेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या