लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात इस्रायलविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करत असलेल्या तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) सदस्यांनी लाहोरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखपुरा भागात अमेरिकन फास्टफूड सेंटर केएफसीच्या आऊटलेटवर हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार केला तसेच केएफसीच्या आऊटलेटची तोडफोड केली. गोळीबारात केएफसीचा एक ४५ वर्षांचा कर्मचारी ठार झाला. आसिफ नवाज असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलीस पोहोचण्याआधीच हिंसा करणारे पळून गेले होते. पोलिसांनी हिंसेप्रकरणी ३६ पेक्षा जास्त नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कराची आणि लाहोरमध्येही केएफसीच्या आऊटलेटना लक्ष्य करुन हल्ले करण्यात आले होते.
पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केएफसीच्या आऊटलेटना लक्ष्य करुन हल्ले केल्याप्रकरणी पोलिसांनी तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) १७ सदस्यांना अटक केली आहे. आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
धार्मिक निषेधाच्या नावाखाली परदेशी कंपन्यांच्या दुकानांना तसेच हॉटेलांना लक्ष्य करुन हल्ले करणे, तोडफेड करणे, लुटालूट करणे असे प्रकार पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बांगलादेशमध्ये ही बोगरा, सिल्हेट, कॉक्स बाजार आणि इतर जिल्ह्यांमध्ये जमावाने निषेधाच्या नावाखाली परदेशी कंपन्यांच्या दुकानांना तसेच हॉटेलांना लक्ष्य करुन हल्ले करणे, तोडफेड करणे, लुटालूट करणे असे प्रकार केले आहेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…