US Tarrif : अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी मालावर आता २४५ टक्के आयात शुल्क लागू

वॉशिंग्टन : अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी मालावर आता २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होणार आहे. इतर देशांवर वाढीव आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय अमेरिकेने स्थगित केला आहे. यामुळे चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किंमतीत आता प्रचंड वाढ होणार आत. या उलट इतर देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर तुलनेत कमी आयात शुल्क असेल. यामुळे चिनी वस्तू आणि सेवा अमेरिकेत महाग होणार आहे. याचा चिनी मालाच्या खरेदीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. चिनी मालाच्या खरेदीत घट होण्याची तसेच चिनी मालाला असलेली अमेरिकेतली मागणीच कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



अमेरिकेने सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) धोरण जाहीर केले. यानंतर भारतासह अनेक देशांनी आयात शुल्क या मुद्यावर अमेरिकेशी बातमीत करण्याची तयारी दाखवली. यामुळे अमेरिकेने संबंधित देशांवरील वाढीव आयात शुल्काचा निर्णय स्थगित केला. पण चीनने अमेरिकेच्या सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या चीनमध्ये आयात होणाऱ्या मालावर (वस्तू आणि सेवा) वाढीव आयात शुल्क लागू केले. या निर्णयाचे पडसाद उमटले. अमेरिकेने चिनी मालावर एकूण २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होईल, असे जाहीर केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने नवा आदेश जारी झाला.



ट्रम्प यांनी सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) जाहीर करण्याआधी चिनी मालावर अमेरिकेत वीस टक्के आयात शुल्क लागू होते. ट्रम्प यांनी चिनी मालावर आधी १२५ टक्के आयात शुल्क लागू केले. यामुळे चीनवरील एकूण आयात शुल्क १४५ टक्के झाले. आता यात आणखी १०० टक्क्यांची वाढ करुन अमेरिकेने चिनी मालावर (वस्तू आणि सेवा) एकूण २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होईल, असे जाहीर केले.
Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही