Shah Rukh Khan : DDLJने रचला इतिहास! शाहरुख-काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारणार

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) यांचा १९९५ साली प्रदर्शित झालेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' (DDLJ) या चित्रपटाने अजूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर निर्माण केलं आहे. राज आणि सिमरनची प्रेमकथा पाहण्यासाठी लोक आजही वेडे आहेत. या भारतीय चित्रपटाबाबत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लंडनच्या प्रसिद्ध लीसेस्टर स्क्वेअरमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे'चा खास कांस्य पुतळा उभारण्यात येणार आहे.



डीडीएलजेमधील अनेक महत्त्वाची दृश्यं लंडनमध्ये चित्रीत झाली होती. विशेषतः लीसेस्टर स्क्वेअर हे ठिकाण त्या दृश्यात दिसत आहे. जिथे राज (शाहरुख) आणि सिमरन (काजोल) पहिल्यांदा अनोळखीपणे एकमेकांसमोर येतात. हा नवीन पुतळा ओडिऑन (Odeon) सिनेमाजवळ, म्हणजेच त्या दृश्याच्या पार्श्वभूमीत, बसवण्यात येणार आहे. हा चित्रपट लंडनमधील लेस्टर स्क्वेअरमधील प्रसिद्ध 'सीन्स इन द स्क्वेअर' चित्रपटाच्या ट्रेलमध्ये सन्मानित करण्यात आला आहे. यशराज फिल्म्सच्या मते, हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने घोषणा केली आहे की लेस्टर स्क्वेअरमधील रोमांचक 'सीन्स इन द स्क्वेअर' चित्रपटाच्या ट्रेलमध्ये एक नवीन पुतळा सामील होईल, ज्यामध्ये ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजे) चा लंडनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा असेल.


ही कांस्य मूर्ती शाहरुख खान आणि काजोल यांना चित्रपटातील त्याच्या आयकॉनिक पोजमध्ये आहे. या पुतळ्याचे अनावरण २०२५ च्या वसंतात होणार असून, यावेळी डीडीएलजे (DDLJ) च्या ३० व्या वर्धापन दिनाचाही मोठा उत्सव सुरू होईल.


हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सचे मार्क विल्यम्स म्हणाले, “DDLJ हा केवळ चित्रपट नाही, तर एक भावना आहे. जगभरातल्या प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतलं आहे.” यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी म्हणाले, “DDLJ ने बॉलिवूडमध्ये नवा अध्याय सुरू केला. ३० वर्षांनीही या चित्रपटाचा प्रभाव तसाच आहे. ही मूर्ती त्याच्या आंतरराष्ट्रीय ओळखीचं प्रतीक आहे.”

Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह