Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

दिल्ली : विमान कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे रुग्णालयात लैंगिक शोषण करण्यात आले. ही महिला व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक शोषण केले. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खासगी विमान कंपनीत काम करणारी महिला गुरुग्राम या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आली होती. त्यावेळी ती एका हॉटेलमध्ये राहत होती. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तिला श्वास घेणं कठीण झालं होतं. त्यानंतर या महिलेला गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेला उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ही महिला रुग्णालयात दाखल झाली होती.



महिला व्हेंटिलेटरवर होती आणि अर्धवट शुद्धीत आली होती. पण जास्त हालचाल करू शकत नव्हती. याच सुमारास ६ एप्रिल रोजी तिचे लैंगिक शोषण झाले. व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. ही घटना घडली त्यावेळी तिथे दोन परिचारिकाही उपस्थित होत्या; असा गंभीर आरोप महिलेने केला आहे.


महिलेने ही माहिती १३ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यावर कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे