AI Center : मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये होणार एआय केंद्र!

Share

मुंबई : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम यांच्यात मुंबईतील मंत्रालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे प्रशासनात अमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.या कराराअंतर्गत राज्यातील तीन प्रमुख शहरांमध्ये एआय कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे उभारण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा ऐतिहासिक करार पार पडला आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत ‘एआय’ संशोधन व ‘मारवेल’ अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या एआय-केंद्रांमधून सरकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना एआय, सायबर सुरक्षा आणि क्लाऊड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आयबीएमच्या आघाडीच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचा वापर करून कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. या सामंजस्य कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल आदी उपस्थित होते. या कराराद्वारे व्हर्चुअल सहायक आणि एजेन्टिक ‘एआय’च्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे.

‘एआय’ मॉडेल्सवरील मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असून, तंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार. जनरेटिव्ह ‘एआय’चा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक आधुनिक, अंदाजाधारित व पारदर्शक बनवली जाणार असून, हायब्रिड क्लाऊड, ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली यावर विशेष भर दिला जाणार आहे

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago