
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान, सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा काही दिवसांपूर्वी एक विडिओ वायरल झाला होता. त्यामध्ये त्याचे म्हातारपण दिसून येत होते, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. ‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. अशा ट्रोलर्सना आता सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे.
सलमानने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करणा-या नेटक-यांना उत्तर दिले आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्याने त्याचे जिममधले दोन फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यावर त्याने म्हटलंय.. 'प्रेरणेसाठी धन्यवाद'.

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान तिच्या धाडसामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेकांसाठी प्रेरणा ...
सलमानच वय ५९ असून सुद्धा अजूनही तो फिट दिसतो. 'सिकंदर' सिनेमाच्या ट्रेलरच्या वेळीही तो चर्चेत आला होता. त्यावेळी सुद्धा त्याने ट्रोलर्सना उत्तर दिले होते. “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे”, असे तो म्हणाला होता