Avaada Company : आवादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीचा वाल्मिक कराडशी संबंध ?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आवादा कंपनी चर्चेत होती. या आवादा कंपनीतुन पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची माहिती मिळाली. या चोरी प्रकरणात 'आवादा' कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या चोरीमागे वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांचा हात असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी आवादा कंपनीतील पवनचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून तेथून चार चोरांनी तांबे चोरी केले. या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकानेे बबन सरदार शिंदे, धनाजी रावजी काळे, मोहन हरी काळे आणि लालासाहेब सखाराम पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेने वाल्मिक कराडचे सहकारी अजूनही कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री