अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर मात्र गावकऱ्यांची चांदीच चांदी झाली. आज (दि १५) सकाळी आठच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये पेट्रोलच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर झाला. मात्र जखमी झालेल्या चालकाचे प्राण वाचवायचे सोडून या अपघाताची बातमी गावभर समजल्यावर गावकऱ्यांनी पेट्रोल घेण्यासाठी गर्दी केली.
मिळलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या करंजी घाटात आज (दि १५) सकाळी २० हजार लिटर क्षमतेचा पेट्रोलचा टँकर उलटून अपघात झाला. मुंबईवरून परभणीच्या दिशेने हा टँकर निघाला होता. पण घाटामध्ये हा टँकर उलटला. टँकरचा ब्रेकफेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ टँकरला अपघात झाला. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. पेट्रोलच्या टँकरच्या अपघाताची बातमी समजताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
स्वतःच्या घरातून शक्य होतील ती भांडी घेऊन ते पेट्रोल भरण्यासाठी आले. कुणी पाण्याच्या बाटल्या, कुणी पाण्याचे कॅन, तर कुणी दुधाच्या किटल्या घेऊन आले आणि त्यामध्ये पेट्रोल भरून ते पसार देखील झाले. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती त्यामुळे माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच अहिल्यानगर आणि पाथर्डीतून अग्निशमन दलाच्या दोन गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…