Health: सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने दूर होतील हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचा वापर प्रामुख्याने जेवण करताना फोडणीसाठी केला जातो. मात्र आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. नियमितपणे रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया याचे फायदे...



वजन होते कमी


कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.



कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो.


कडिपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल बाहेर निघते.



डोळ्यांचे आरोग्य राहते चांगले


कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.



त्वचेचे विकार होतात दूर


कडिपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. पिंपल्स, फोड, पुटकळ्या, डाग बरे होतात.


Comments
Add Comment

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी

वारंवार येणाऱ्या तापावर आयुर्वेदिक उपचार : गोकर्ण वनस्पतीचा काढा ठरतोय प्रभावी

मुंबई : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला, अंग दुखणे आणि ताप याचा त्रास होतो. पावसाळा,

कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे.

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या