Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

LSG vs CSK, IPL 2025: धोनीचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देईल?

LSG vs CSK, IPL 2025: धोनीचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देईल?

मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नई सुपर किंग्ज अजूनही सावरत नाही आहे. गेल्या सामन्यात कोलकत्ताने त्यांचा दारुण पराभव केला. शिवम दुबे व विजय शंकर वगळता एकाही खेळाडूला धावा जमवता आल्या नाहीत. त्यात फिरकीचा प्रभाव जास्त होता. धोनीला आजचा सामना जिंकायचा असेल तर संघात काही बदल करावे लागतील. राहुल त्रिपाठी सतत अपयशी ठरत असेल तर त्याच्या जागेवर दिपक हुडाला संधी देऊन बघायला हवी.


रवींद्र जडेजा सध्या फॉर्ममध्ये नाही आहे, त्याबद्दली सॅम करनला संधी दिली गेली पाहिजे. लखनऊचे मैदान गोलंदाजीला उपयुक्त आहे आणि त्यात फिरकीला साथ देणारे आहे. चेन्नईकडे नूर अहमद व आर अश्विन सारखे गोलंदाज आहेत त्यामुळे आज ते लखनऊ संघाला कमी धावामध्ये रोखू शकतात. चेन्नईला बिश्नोई व दिग्वेज सिंगची फिरकी खेळून काढावी लागेल.


ऋषभ पंतचा संघ सहापैकी चार सामने जिंकून आपले वर्चस्व राखून आहे. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजाकडून सातत्याने चांगली कामगिरी केली जात आहे. आजचा सामना पूरण विरुद्ध नूर अहमद असा होऊ शकतो कारण ह्या अगोदर नूर अहमदने भल्या-भल्या फलंदाजाना बाद केले आहे. मिचेल मार्श आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप माहिती नाही मात्र त्याची गैरहजेरी संघाला नक्कीच डोकेदुखी ठरू शकते. ऋषभ पंतला अजूनही सूर गवसलेला नाही.


चला तर बघू महेंद्रसिंह धोनीची नवीन कर्णधार पदाची खेळी ऋषभ पंतच्या संघाला रोखू शकते का?

Comments
Add Comment