Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १३ ते १९ एप्रिल २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

महत्त्वाची कामे हातावेगळी करता येती

मेष : या आठवड्यात अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील. मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीची दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. चांगल्या बातम्या मिळतील. सरकारी महत्त्वाची कामे विनाविलंब होण्याची शक्यता. अडचणी दूर होतील. नोकरीमध्ये प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी. उन्नती, प्रगती होईल. वरिष्ठ आपल्या कामावरती खूश राहतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. कौतुकास पात्र ठराल. जर नोकरीत बदल करायचा असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीचे फायदे होतील. सामाजिक कार्यात रस घ्याल. 

वातावरण सुखद राहील

वृषभ : मनोरंजन तसेच मौजमजेकडे कल राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय राहाल. जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. खर्च वाढेल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रवासात काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवनसाथी आपल्या मनासारखे वागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. कुटुंब परिवारातील वातावरण सुखद राहील. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील. स्वतःचा छंद, कला वाढविण्यासाठी वेळ मिळेल. चांगल्या पुस्तकांचे वाचन होईल. हितचिंतकांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता.

भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी खर्च

मिथुन : हा आठवडा खर्चात वाढ करू शकतो. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. तसेच रोजच्या वापरातील उपकरणे यावर खर्च होऊ शकतो. वाहनाच्या देखभालीच्या खर्चावर वाढ होईल. तसेच घरातील भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी खर्च करण्याची इच्छा होईल. आर्थिक आवक मनासारखी राहिल्याने मनसोक्त खर्च करू शकाल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे एखाद्या कारणाने पैशाचा अपव्यय होऊ शकतो. नोकरीत सामान्य परिस्थिती राहून विशेष बदल घडणार नाहीत.

अपेक्षित सहकार्य मिळू शकते

कर्क : कुटुंब परिवारामध्ये एखादी विवाह सारखी अथवा एखादे मंगल कार्य ठरल्यामुळे लगबग राहील. परिवारातील सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकते. अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. खर्चात वाढ होईल. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे आपण समाधानी राहाल. व्यवसाय-धंद्यात भरभराट होऊ शकते. उलाढाल वाढेल. फायद्याचे सौदे हाती येतील मात्र सरकारी धोरणांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. नोकरी-धंद्यात, आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. अधिकार कक्षा रुंदावतील. नवीन नवीन संधी उपलब्ध होतील.

आत्मविश्वासात वाढ होईल

सिंह : प्रत्येक क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण होतील. विविध प्रकारच्या लाभांनी लाभान्वित व्हाल. इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. मनावरील ताण नाहीसा होईल. आरोग्य चांगले राहील. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. आर्थिक आवक चांगली राहिल्याने बचतीचे नियोजन नीट केले जाईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीविषयक केलेले प्रयत्न यशस्वी होतील. चालू नोकरीमध्ये थोडी दगदग होण्याची शक्यता आहे. काम वाढेल.

कार्यव्याप्ती वाढेल

कन्या : आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपली कार्य व्याप्ती वाढेल. जास्तीची कामे करावी लागतील. कुटुंबातील तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्नांची गरज राहील. विशेषतः सरकारी कामे करताना वेळ व खर्च दोन्ही वाढू शकतो. स्वभावात चिडचिडीपणा येईल. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे चुकीचे ठरेल. स्वतःला शांत राहण्याची गरज संयम ठेवा. सबुरीने घ्या. आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. काहींना प्रवास करावा लागेल.

घेतलेल्या कष्टाला फळ मिळेल

तूळ : आपण केलेल्या अथवा घेतलेल्या कष्टाला फळ मिळेल. आपल्या धडपडीला या कालखंडात यश मिळेल. एखादे महत्त्वाचे काम जे आत्तापर्यंत पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या असे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती याविषयी रखडलेले व्यवहार गतिशील होतील व पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल. स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसाय-धंद्यात चांगली परिस्थिती राहील.

फायद्याचे सौदे हाती येतील

वृश्चिक : धनलाभाच्या दृष्टीने सप्ताह चांगली फळे देईल. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. विविध प्रकारच्या लाभानी लाभान्वित व्हाल. चालू नोकरीत अपेक्षित घटना घडून पदोन्नती मिळू शकते. लहान-मोठे प्रवास करावे लागतील. जबाबदाऱ्यांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता. व्यवसाय-धंद्यात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. तसेच व्यावसायिक जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. काही फायद्याचे सौदे हाती येतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील.

नवीन बदल करता येतील

धनू : कुटुंब परिवारातील व आपल्या व्यवसाय धंद्यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे नियोजन करावे लागेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन बदल करता येतील. व्यवसायात केलेले बदल पोषक ठरतील. घरातील कामे व नोकरी यांचा समन्वय साधावा लागेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे कार्यमग्न राहाल.

सकारात्मक घटना

मकर : आपल्या अवतीभोवती काही सकारात्मक घटना घटित झाल्यामुळे अनुकूलतेमध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक काही अडचणी उद्भवल्यामुळे काम पूर्ण होण्यास थोडासा अवधी लागेल. विलंबाने कामे होतील. निराश न होता आपल्या कार्यात कार्यमग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका. नोकरीविषयक प्रयत्न सफल होतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल होऊन नोकरीसाठी बोलावणे येईल. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल. कुटुंब परिवारात आनंददायक वातावरण राहून घ्या.

नवीन योजना सफल होईल

कुंभ : आपल्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण झाल्याने आपल्या स्वभावात चिडखोरपणा येईल. त्यामुळे इतरांवर राग निघण्याची शक्यता. होणारे काम होणार नाही म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या. विशेषतः जीवनसाथीबरोबर होणारे वाद-विवाद दुर्लक्षित करा. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. घरातील उपकरणे तसेच वाहने यांच्या देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. पण खर्च आवश्यक असल्याने ते करावेच लागतील. नवीन योजना सफल होईल.

प्रशंसेस पात्र ठराल

मीन : आपल्या कर्तृत्वाला वाव मिळून कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठराल. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामगिरीसाठी आपली निवड होऊ शकते. परदेशगमन. खेळाडू, कलाकार यांना अनुकूल कालावधी. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रसिद्धी बरोबरच अर्थार्जन यामध्ये वाढ होईल. एकूणच आर्थिक आवक चांगली राहिल्यामुळे खर्च स्वतः करू शकाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी होईल. राहत्या घरासाठी खर्च करावा, सुशोभीकरणासाठी खर्च होऊ शकतो.

Recent Posts

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

37 minutes ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

51 minutes ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

1 hour ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

2 hours ago

Pune News : स्मार्ट पुण्यात बनावट कपड्यांचा सुळसुळाट!

पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…

2 hours ago

Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…

2 hours ago