माधव रानडे एक 'अनमोल रत्न'

  26

मुंबई  (केदार भावे) : गेल्या महिन्याभरात अनेक दिग्गज खेळाडूंचा वाढदिवस होऊन गेला, त्यातील क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत खेळाडू म्हणजे माधव रानडे. ज्यांनी नुकताच पंचाहत्तरीचा टप्पा पूर्ण केला. तसेच क्रिकेट या क्षेत्रात अनेक लहान-मोठ्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर क्रिकेटप्रेमींच्या मनावर छाप उमटावली आहे. असेच सगळ्यांचे लाडके आणि क्रिकेटचे पुजारी म्हणून माधव रानडे यांची सर्वत्र ख्याती आहे. सर्वात प्रथम माधव रानडे यांना गोलंदाजी करताना पाहिले ते पीवायसीच्या जुन्या मैदानावर. तेव्हा भांडारकर सर हे पीवायसी मैदानावर प्रशिक्षण घेत असत. प्रत्येक फिरकी गोलंदाजाला ते "माधवची गोलंदाजीची आदर्श शैली" म्हणून दाखवीत असत. माधव गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीवर जवळ फिल्डिंग करणारे काही क्षेत्ररक्षक म्हणजे विनू द्रविड, भालचंद्र, सुरेंद्र आजही सांगतात की, त्याच्या चेंडूच्या फिरकीमुळे एक विशिष्ट आवाज येत असे आणि असा आवाज फक्त पूर्वीचे भारताचे फिरकी जादूगार बेदी, प्रसन्ना वेंकट यांच्याच गोलंदाजीच्या वेळीच येत असे.



अनेकांच्या मते श्रेष्ठ गोलंदाजी करणारे रानडे ही एकमेव व्यक्ती. खुद्द गावसकर सुद्धा त्यांच्या गोलंदाजीचे कौतुक करत. हेमंत कानिटकर, राजू भालेकर, साळगावकर, यजुवेंद्र सिंग असे फार मोठे खेळाडू आपल्या महाराष्ट्राला लाभले, पण माधव त्या पैकीच एक आहे. माधवचे महत्त्व फक्त एवढेच नाही हों.. त्याचा बायोडाटा ही अत्यंत तगडा आहे. रणजी ट्रॉफी खेळल्या नंतर म्हणजे १९७८ पासून २०२० या ४२ वर्षे या कालखंडात ते व्यवस्थापकीय समितीचे मेंबर राहिलेले असून इतका मोठा कालावधी आजपर्यंत कोणाचाच नाही. तसेच पीवायसी क्लब चे सेक्रेटरी पद त्यांनी सलग १६ वर्षे भूषविलेले आहे. पीवायसी संघाने जे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय खेळाडू भारताला दिले, त्यात माधव रानडे यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफी संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष पद त्यांनी ३ वर्षे भूषविलेले आहे. त्यांनी बीसीसीआयतर्फे सलग ३ वर्षे मॅच रेफ्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत पाहून २०१२ या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर व्यवस्थापक म्हणून त्यांची वर्णी लागली होती. पुण्याच्या गेहूजे स्टेडियमचे काम २००३ साली सुरु होऊन २०१४ पर्यंत त्यांचे ११ वर्षे खजिनदारचे काम त्यांनीं चोख बजावले आहे. महाराष्ट्राच्या अनेक निवडणुका होऊन सुद्धा आलेल्या नवीन कमिटी मध्ये माधवचे कोणत्या ना कोणत्या पदावरचे स्थान हे 'अढळ' असे, कारण काही कर्तबगारी असल्याशिवाय असे घडत नाही हे मात्र अगदी खरे आहे. माधव तसा अबोल, काहीसा स्वतः च्या विचारांनी चालणारा असला तरी क्रिकेट क्षेत्रातील पारंगत असा 'अनमोल रत्न' आहे.

Comments
Add Comment

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन