Barbie box trend goes viral : घिबली नंतर बाजारात आला AI डॉल ट्रेंड!

मुंबई : मुलींच्या बालपणातील सर्वात आवडीची बाहुली म्हणजे 'बार्बी'. या बार्बीचे नंतर अनेक प्रकार आले. मात्र बाहुली प्रकारात आवडीने दुकानातून खरेदी करताना बार्बीची निवड केली जाते. आता तुम्हाला जर सांगितलं तुमचा फोटो आता बार्बी सारख्या बाहुल्यांचा आकार घेणार आहे तर तुम्हाला नवल वाटेल. पण हे खरं आहे. 'घिबली'ने जगाला वेड लावले. अगदी देशाचे पंतप्रधान देखील यात मागे नाहीत. या घिबलीने लोकांची हौस पुरवली आणि त्याचबरोबर काही अंशी नागरिकांची गोपनीय माहिती चोरून बँक खाती रिकामी केली. परंतु 'घिबली'नंतर आता मार्केट मध्ये AI डॉल ट्रेंड धुमाकूळ घालत आहे.



काय आहे AI डॉल ट्रेंड ??


तुम्ही लहानपानापासून बार्बी किंवा एखाद्या ऍक्शन कार्टूनचे बॉक्स मधील खेळणे पहिले असतील. जी खेळणी बाहुली स्वरूपात प्लॅस्टिकची असतात. अशाच प्रकारे तुमच्या फोटोंचा वापर करून तुम्ही सुद्धा स्वतःला ऍक्शन टॉय स्वरूपात रूपांतर करू शकता. यालाच AI डॉल ट्रेंड म्हणतात. या व्हायरल ट्रेंडमध्ये एआय टूल्सचा वापर करून तुमचा फोटो एका स्टायलिश अ‍ॅक्शन फिगर किंवा बाहुलीमध्ये रूपांतरित करू शकता, जो प्लास्टिकच्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये पॅक केला जातो. हा टॉय बॉक्स ट्रेंड घिबली नंतर बाजारात प्रचंड व्हायरल झाला आहे.



AI डॉल ट्रेंड कसा फॉलो कराल ??


१. सर्वात आधी तुमच्या गूगल ब्राऊझर वर AI चॅट जीपीटी उघडा
२. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला तुमचा शक्यतो एकट्याचा फोटो निवडा. जो फोटो सेल्फी किंवा स्थिर फोटो असेल. AI डॉल ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्यासोबत ग्रुप फोटो किंवा मित्र मैत्रिणीचा फोटो घेऊ शकत नाही. कारण एका वेळेस एकाच व्यक्तीचा फोटो AI डॉल ट्रेंडमध्ये रूपांतरित होतो.
३. AI चॅट जीपीटीवर तुमचे फोटो टाकताना तो फोटो ​​तुमचा पोशाख दर्शविणारा पूर्ण-लांबीचा असावा.
४. AI चॅट जीपीटीवर तुमचा फोटो टाकल्यानंतर चॅट जीपीटीला तुमचा फोटो AI डॉल ट्रेंड मध्ये रूपांतरित करण्यासाठी सूचना द्या. विशेष म्हणजे सूचना देताना तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सूचना देऊ शकता ( उदा. “Turn this photo into a realistic Barbie doll action figure in a colorful plastic toy box. Include accessories like a camera, sunglasses, and a skateboard. The box should say ‘[your name or description]’ at the top, with the slogan ‘Adventure Mode On!’ in bold. Use bright pink and blue colors.” )
५. जर चॅट जीपीटीने तुमच्या आवडीनुसार कलाकृती तयार केली नसेल तर तुम्ही त्यात बदल करू शकता. उदा. तुम्ही तुम्हाला तुमच्या कपड्यांचे रंग बदलायचे असतील, बॉक्सची डिझाईन बदलायची असेल तर तुम्ही पुन्हा चॅट जीपीटीला सूचना देऊ शकता. आणि तुमचा फोटो डाउनलोड करू शकता.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील