नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहली व्यस्त आहे, पण मैदानाबाहेरही तो त्याच्या बिझनेसमध्येही सक्रिय आहे. अलीकडेच असे उघड झाले की, कोहलीने जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी पुमा सोबतचा त्याचा ८ वर्षांचा करार संपवला आहेत.
कोहली आणि प्यूमाचा हा प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला, तेव्हा या कंपनीने टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीला ८ वर्षांसाठी करारबद्ध केले आणि त्या बदल्यात त्याला ११० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम दिली. आता २०२५ मध्ये कोहली आणि पुमा यांच्यातील हा करार पूर्ण झाला आणि दोघेही वेगळे झाले आहेत.
पण, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ही कंपनी पुढील ८ वर्षांसाठी कोहलीसोबतचा करार सुरू ठेवू इच्छित होती. त्यासाठी त्यांनी या स्टार फलंदाजाला ३०० कोटी रुपयांची मोठी ऑफर देखील दिली होती. पण विराटने नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्याने पुमाची ही ऑफर नाकारली, असे म्हटले जात आहे.