Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

‘अग्निवीर’साठी २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

‘अग्निवीर’साठी  २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली : देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना इंडियन आर्मी अग्निवीर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार यापूर्वी काही कारणास्तव अर्ज करू शकले नव्हते त्यांना आता आणखी एक संधी मिळाली आहे. नवीन तारखेनुसार, इच्छुक उमेदवार आता २५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज ऑनलाइन भरता येईल. यापूर्वी या भरतीसाठी १० एप्रिल २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती.
Comments
Add Comment