कांदिवलीत उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने उद्या १२ एप्रिल, २०२५ रोजी भुरामाई हॉल, शांतीलाल मोदी रोड, ईराणी वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



या मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत व प्राथमिक निवड केली जाणार आहे. यावेळी शासनाच्या विविध महामंडळामार्फत सवलतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्था हजर राहणार आहेत.


राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इन्टर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय / विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी या महारोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ४८ तासांत मोठी अपडेट

Mumbai Rain : मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांप

BMC: सो व्हॉट? महापालिका अधिकाऱ्याचा अरेरावीपणा

लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी महापालिका राजशिष्टाचार अधिकारी यांच्या विधी समितीत निलंबनाचा ठराव मुंबई

Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल

Mumbai Rain : जुलैमधील पावसावर मुंबईकरांचे भविष्य

पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची हजेरी लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत (Mumbai )मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस

BMC : मुंबईत पाण्यावरून रान उठले

मुंबईतील रेनवॉटर हार्वेस्टींग योजनेतंर्गत सर्व इमारती, संकुलांचे ऑडीट करा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील (Mumbai)

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण