Mumbai Rain : जुलैमधील पावसावर मुंबईकरांचे भविष्य

पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची हजेरी लागणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत (Mumbai )मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस (Rain) पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण महिन्याचा अंदाजानुसार पाऊस नसेल. त्यामुळे ३० जूनपर्यंतचा अंदाज भरुन निघणार नाही, जुलैमध्ये अपेक्षित पडतो की किती यावर सर्व अवलंबून आहे. जुलैमध्ये किती पडतो यावर अवलंबून आहे. सध्या साडेआठ टक्के पाणी साठा असून हा साठा २० ऑगस्टपर्यंत टिकेल. तसेच पुढील परिस्थिती पाहून तलाव क्षेत्रात कृत्रित पाऊस पाऊस पाडण्याचा विचार केला जाईल. पण तुर्तास याबाबत कोणताही विचार नाही असे महापालिका (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. दरम्याने रेनवॉटर हार्वेस्टींग संदर्भात सर्व इमारतींचे ऑडीट करण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आश्वासन दिले.



मुंबईत सध्या १५ मे पासून १० टक्के कपात करण्यात आली आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने काही भागांमध्ये समस्याचा सामना करावा लागतो. मुंबईला ४६०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून येत्या,४००० प्रतीदिन पुरवठा केला जात आहे. तर कधीतरी ४१०० दशलक्ष केला जातो. त्यामुळे ५०० ते ६०० दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. दहा टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याने या कपातीचा परिणाम पातळीवर होतो. पाण्याचा दाब कमी झाला आहे. त्याचा परिणाम टोकावरील वस्त्यांमध्ये किंवा इमारती व चाळींना होत आहे. भूमिगत टाक्या नाही त्यांना होता, नागरिकांना यामुळे असुविधेचा सामना करावा लागतो,


टँकर उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असून महापालिका खासगी टँकर भाड़याने घेण्यात येत आहे. सध्या ज्याठिकाणी १० टक्के पेक्षा कमी कपात असेल तर त्या ठिकाणी मागणी असेल तर तिथे टँकर पुरवला जाईल. तसेच मुंबईतील महापालिकेच्या सर्व जलभरणा केंद्रांमध्ये वन टाईम ओटीपी दिला जाईल आणि त्यांना एकदाच टँकर भरता येईल अशाप्रकारे धोरण बनवले जात आहे. त्यानुसार लवकरच निर्णय गटनेत्यांच्या मान्यतेने घेवू.



विहिरी पुनर्भरण कार्यक्रम सुरु करावा. त्यासाठी बजेट दिले आहे, त्या वॉर्डकडून विहिरी निश्चित त्यानुसार कार्यक्रम सुरु ठेवला जाईल असे बांगर यांनी स्पष्ट केले.


मुंबईत पाणी गळती व चोरीची समस्या ही नसून दरवर्षी गळती कमी करण्यासाठी १ टक्के जलवाहिनी बदलण्याचा प्रयत्न करत असतो. पाणी चोरीची माहिती लोकप्रतिनिधी देतात असे नव्हे तर पाणी चोरी पकडून देतात, दंड नको तर गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी असते. याचे काही परिणाम दिसून येत नाही. यामध्ये पाणी चोरी व्यापकपणे राहावी. त्यातून पाण्याचे नुकसान होते तसेच महसूल मिळत नाही, त्यामुळे त्यांना नियमित जोडणी दिल्यास त्यावर अंकूश लावू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून