Friday, January 16, 2026

Share Market : आनंदाची बातमी, शेअर बाजाराने मारली उसळी

Share Market : आनंदाची बातमी, शेअर बाजाराने मारली उसळी
मुंबई : अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर लागू केलेल्या टॅरिफला स्थगिती दिली आहे पण चीनवर १४५ टक्के टॅरिफ लागू केला आहे.चिनी मालावर आधीपासून २० टक्के टॅरिफ होता. आता अमेरिकेने चिनी मालावर आणखी १२५ टक्के टॅरिफ लागू केला. यामुळे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या चिनी मालावर एकूण १४५ टक्के टॅरिफ लागू होणार आहे. या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळीच शेअर बाजाराने उसळी मारली आहे.
बीएसई सेन्सेक्सने दीड हजारांपेक्षा जास्त अंकांनी उसळी मारली आणि ७५,३८३.९७ वर पोहोचला तर एनएसईचा निफ्टी फिफ्टी ४९० पेक्षा जास्त अंकांनी उसळी मारुन २२,८९३.४५ वर पोहोचला. ट्रम्प प्रशासनाने आयात शुल्काला अर्थात परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या मालावर लागू होणाऱ्या कराला (टॅरिफ) ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याआधी ट्रम्प प्रशासनाने भारतासह अनेक देशांसाठी वेगवेगळे टॅरिफ जाहीर केले होते त्यावेळी जगभर शेअर बाजार धाडकन आपटले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >