Todi Mill Fantasy : तरुणाईंच्या ‘तोडी मिल फँटसी’ नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरीने आणि जिगीषाने केले सहकार्य

मुंबई : अनेक कलाकारांना जितकी ओढ चित्रपट आणि मालिकांची असते त्याहून जास्त त्यांची नाळ हि रंगभूमीशी जोडलेली असते. प्रत्येक नटाचा नाटक आणि रंगभूमी श्वास असतो. कलाकार खऱ्या अर्थाने आकार घेतो तो रंगभूमीवरच. अशा तरुणाईंनी अजूनही रंगभूमीशी नातं तितकंच घट्ट ठेवलं आहे. अजूनही प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडतायेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावताहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आणि नाटकातील कलाकार मंडळी उपस्थित होती.



या नाटकाला सहकार्य करण्याबद्दल अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, ‘माझ्या ‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक झालं आणि आजवर अनेक भाषांमध्ये त्याचे प्रयोग झाले. या एकांकिकेच व्यावसायिक नाटक व्हावे यासाठी ज्या दोन माणसांनी पुढाकार घेतला त्यातलं एक नाव म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दुसरं महेश मांजरेकर या दोन माणसांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे हे शक्य झालं. नव्या उमद्या काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी मी काय करू शकतो? तर त्यांना सहकार्य करू शकतो, म्हणून हा सहकार्याचा हात. या सहकार्याला अनुभवी अशा जिगीषा अष्टविनायक संस्थेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने ‘तोडी मिल फँटसी’ हे नाटक आता चांगल्या प्रकारे पोहचेल याची खात्री त्यांनी बोलून दाखविली. ‘तोडी मिल फँटसी’ सारखं उच्च दर्जाचं ब्रॉडवे नाटक ज्याचे जगभरात एकाच दिवशी अनेक प्रयोग होतील असं नाटक करण्याची इच्छा अंकुशने यावेळी बोलून दाखविली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी असं नाटक आणलं तर आपण नक्कीच रंगभूमीवर पुनरागमन करू असं अंकुशने सांगताच, चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यास सहमती दर्शवली.


गिरण्यांच शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वीं गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी.. याच फॅन्टसी वर बेतलेलं गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नाटकाचे प्रयोग शुक्रवार १८ एप्रिल रात्रौ ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, १९ एप्रिल रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० एप्रिल रात्रौ ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या ठिकणी रंगणार आहेत.


‘तोडी मिल फँटसी’ ही कथा आहे तीन मित्रांची - घंट्या, अम्या, शिऱ्या आणि त्यांच्या स्वप्नांची, ज्यांनी मुंबई ह्या स्वप्नांच्या नगरीमधे आपले जीवन व्यतीत केले आहे. ही कथा सुरू होते एका आलिशान रेस्टो-बारच्या वॉशरूममध्ये , जेव्हा त्या रात्री, जेव्हा घंट्या, अम्या आणि शिऱ्या त्यांच्या स्लम टुरिझम व्यवसायाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेणार असतात, तेव्हा ईशा सिंह नामक एक अत्यंत श्रीमंत मॉडेल, घंट्याच्या जीवनात अपघाताने प्रवेश करते आणि त्या सर्वांच्या जीवनात बदल घडतात. हे नाटक तुम्हाला एक संगीतमय प्रवास घडवते, तुम्हाला नाचवते, हसवते, रडवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरातील तुमच्या अस्तित्वाचा पुनर्विचार करायला लावते! या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मुंबईच्या या भूमिपुत्रांच्या फँटसीची गोष्ट नाट्य स्वरूपात उभी करण्याची संपूर्ण प्रकिया पुण्यात झाली आहे. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली अशा संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर केला आहे.


या नाटकाला देसी रिफ, अगस्ती परब आणि कपिल रेडेकरचं संगीत लाभलं आहे. नेपथ्य केतन दुधवडकर तर नेपथ्य निर्मिती प्रकाश परब यांची आहे. प्रकाशयोजना राहुल जोगळेकर, सचिन दूनाखे यांनी केली आहे. वेशभूषा शुभांगी सूर्यवंशी, परीजा शिंदे तर रंगभूषा प्रदीप दरणे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन अक्षय कुमार मांडे यांचे आहे.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच