Thursday, October 23, 2025
Happy Diwali

नातवंडांना गोष्टी सांगण्याच्या वयात खेळतेय T20 क्रिकेट

नातवंडांना गोष्टी सांगण्याच्या वयात खेळतेय T20 क्रिकेट
लिस्बन : वय ही फक्त संख्या आहे हे सिद्ध करत जोआना चाइल्डने ६४ व्या वर्षी टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने पोर्तुगालकडून नॉर्वेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात खेळून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वृद्ध महिला क्रिकेटपटू होण्याचा मान पटकावला. जोआना चाइल्डने पोर्तुगालकडून खेळत नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात आठ चेंडूत दोन धावा केल्या. पोर्तुगालने हा सामना १६ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात तिने केवळ चार चेंडू टाकून ११ धावा दिल्या. पोर्तुगालचा या सामन्यात पराभव झाला.
जोआना चाइल्ड ही उजव्या हाताची फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आहे. पोर्तुगाल संघात १५ वर्षांची ईश्रित चीमा तसेच १६ वर्षांची मरियम वसीम आणि अफशीन अहमद हे युवा खेळाडू आहेत. यामुळे संघात अनुभव आणि तरुणाई यांचा संगम झाल्याचे दिसत आहे.
जोआना चाइल्डने टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी तिचे नेमके वय ६४ वर्षे आणि १८३ दिवस होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणाऱ्यांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वृद्ध महिला क्रिकेटपटू आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर जिब्राल्टरची सॅली बार्टन आहे. सॅलीने डिसेंबर २०२४ मध्ये पदार्पण केले त्यावेळी तिचे वय ६७ वर्षे आणि २०६ दिवस होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा