मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये दिल्लीचा विजयरथ कायम आहे. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ विकेटनी हरवत या हंगामातील सलग चौथा विजय मिळवला आहे. ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मात्र घरच्याच मैदानावर पराभवाचा धक्का बसला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १६४ धावांचे आव्हान दिले होते.मात्र केएल राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने हा विजय सहज साकार केला. दिल्लीसाठी खेळताना केएल राहुलने नाबाद ९३ धावा केल्या. त्याला ट्रिस्टन स्टब्सने चांगली साथ दिली. त्याने ३८ धावा केल्या. दिल्लीने आरसीबीविरुद्ध ६ विकेटनी सहज विजय मिळवला. दिल्लीने आरसीबीने दिलेले १६४ धावांचे आव्हान ६ विकेट आणि १३ बॉल राखत पूर्ण केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून २३ बॉलवर ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीचा अंत फिल साल्ट बाद झाल्याने झाला. साल्टनंतर आरसीबीने देवदत्त पड्डिकल आणि विराट कोहलीची विकेटही लवकर गमावली. पड्डिकलने १ धावा केली तर कोहलीला स्पिनर विप्रज निगमने मिचेल स्टार्कच्या हाती बाद केले.
विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीचा स्कोर ३ बाद ७४ धावा इतका होता. इंग्लीश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला केवळ ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने जितेश शर्माला बाद करत अडचणी वाढवल्या. आरसीबीकडून टीम डेविडने २० बॉलवर नाबाद ३७ धावा केल्यात. या दरम्यान त्याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले.