Friday, April 18, 2025
Homeक्रीडाIPL 2025CSK vs KKR, IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाइट...

CSK vs KKR, IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाइट राइडर्स आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नईला अजूनही लय सापडत नाही आहे. फलंदाजाकडून धावांचा पाठलाग होत नाही आहे. फलंदाजीमध्ये सातत्य नाही आहे. सलामीच्या जोडी कडून संघाला भक्कम सुरुवात करून देता आलेली नाही आहे. कधी रचिन रवींद्र खेळतो तर कॉन्वे ढेपाळतो, कॉन्वे खेळला तर रवींद्र लवकर बाद होतो. मधल्या फळीमध्ये विजय शंकर, ऋतुराज, शिवम हे संघाला सावरण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. धोनीला फिनिशर म्हणून जबाबदारी पार पाडता येत नाही आहे. ऋतुराज गायकवाडला कर्णधार पदाचे डावपेच व्यवस्थित आखता येत नाही आहे. गोलंदाजाचा चांगला वापर करण्यात ऋतुराज कमी पडतो आहे.

कोलकत्ताचा जर विचार करायचा झाला तर त्यांचे प्रयत्न तोकडे पडता आहेत. यपूर्वीचा सामना त्यांनी फक्त चार धावांनी गमावला. आंद्रे रसेलच्या जागेवर त्याना एका नवीन फिनिशरची गरज आहे. ह्या हंगामात एक फिनिशर म्हणून आंद्रे रसेल पुर्णपणे अपयशी ठरला आहे. आजच्या सामन्यात कोलकत्ताचे पारडे चेन्नई पेक्षा जड आहे. कोलकात्याचा संघ मागील सामन्याचा पराजयाचा वचपा आज भरून काढणार. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत कोलकत्ता संघ चेन्नईवर आपले वर्चस्व गाजवेल. चेन्नईला घरच्या मैदानावर कोलकत्त्याच्या फिरकीचा सामना करावा लागेल. कदाचित उलटेही होऊ शकते कारण ह्याच मैदानावर नूर अहम्मदने मुंबईचा पराभव केला होता.

चला तर बघूया चेन्नईच्या मैदानावर कोणाची फिरकी चालते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -