रत्नागिरी : वाढदिवस साजरा होत असताना मला नेहमी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादातून नव्या जबाबदारीची जाणीव होत असते आणि यातूनच नवे काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले. देवरुख येथील मराठा मंदिर येथे महायुतीच्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते खासदार नारायण राणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सौ. निलमताई राणे, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.
खा. राणे म्हणाले आजची गर्दी पाहून मी भारावून गेलो आहे. मराठी माणसासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वयाच्या पंधराव्या वर्षी सदस्य झालो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवलं, प्रेम दिलं त्यांच्यामुळे राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली. आजपर्यंत ११ पदांवर काम केले आहे. पण या पदांमुळे जमिनीशी, तुमच्याशी असलेली नाळ तोडली नाही, सत्ता येते आणि जाते त्यामुळे या पदांमुळे माझ्यात फारसा फरक पडला नाही. या पदांपेक्षाही तुम्हा सगळ्यांना भेटलं, तुमच्या सुखदुःखांना जाणून घेतलं, तुमच्याशी प्रेमाने चार शब्द बोललो हीच माझ्यासाठी प्रेरणा आणि ताकद असते, असे खा. राणे म्हणाले.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त महायुतीचे सर्वच नेते या व्यासपीठावर एकत्र आले आहेत तसंच कोकणच्या विकासासाठी सुद्धा आपण सर्वजण एका व्यासपीठावर येत एकत्रितपणे काम करूया, असं आवाहन सुद्धा खा. राणे यांनी केले. आज तुम्ही सगळेजण मला दादा म्हणता, मान सन्मान देता पण नारायण राणे घडण्यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्याचे हात, तुमचे विचार, साथ सोबत होती म्हणून मी घडत गेलो, हे मी कधीच विसरू शकत नाही असेही खा. राणे यांनी आवर्जून सांगितले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ व्यापाराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख करत जिल्ह्याला यातून मुक्त केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी आपले मनोगत संपवताना केव्हाही कुठल्याही मदतीला मला हाक मारा, मी ओ दिल्याशिवाय राहणार नाही अशी साद सुद्धा त्यांनी उपस्थित सर्वांना दिली. खा राणे यांच्या या प्रत्येक शब्दाला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग…
४०व्या वर्षीसुद्धा दिसू शकता सुंदर! भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीराला शक्ती मिळते. सर्वांच्या घरी हा…
अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची…
मुंबई:‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो…