उत्तराखंड : चारधाम यात्रा (Chardham Yatra) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी, बीकेटीसी (श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती)ने केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) धाममध्ये व्हीडिओ आणि रिल बनवण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, दोन्ही मंदिरांच्या ३० मीटरच्या परिघात कोणतीही व्यक्ती व्हीडिओ-रील बनवू शकणार नाही. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.
केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये, मोठ्या संख्येने भाविक मंदिराभोवती व्हीडिओ आणि रिल बनवू लागतात. त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या. गेल्या वर्षी केदारनाथ धाम संकुलात रिल बनवण्यास पुजाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. अनेक वेळा येथे वादाच्या परिस्थिती पाहायला मिळाली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. म्हणूनच यावेळी चार धाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने विशेष तयारी सुरू केली आहे. जेणेकरून भाविकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी मंदिर समिती एक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करत आहे. यामध्ये आता रील आणि व्हीडिओ करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. (Chardham Yatra 2025)
धार्मिक स्थळांवर व्हीडिओ रील्स (Ban On Reels) इत्यादी बनवणे कितपत योग्य आहे यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बऱ्याच वेळा, माहितीच्या अभावामुळे, आपण इच्छा नसतानाही चुका करतो. आजच्या पिढीसाठी, मंदिरे, मशिदी किंवा तीर्थक्षेत्रे ही फक्त इंस्टाग्राम रीलची पार्श्वभूमी बनली आहेत. शांती आणि ध्यान यांची जागा आता ट्रेंडिंग संगीत आणि स्टायलिश अँगलने घेतली आहे. यामुळे उत्तराखंड प्रशासनाने केदारनाथ धाममध्ये रील्स बनवण्यावर पूर्ण बंदी लादली आहे. कारण स्पष्ट आहे, धार्मिक पावित्र्याचे उल्लंघन आणि शिस्तीचा अवमान रोखण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…