मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागामध्ये साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५ दुकाने बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य डाक कार्यालय व सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेल्या दुकाने व फेरीवाल्यांवरही धडक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय थाटून अतिक्रमण करण्यात आल्याचे ए’ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यानुसार सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमित व अनधिकृत अशी सुमारे २५ दुकाने निष्कासित करण्याची कार्यवाही बुधवारी पार पाडली. त्यासाठी २ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन), ८ कामगार यांच्यासह १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. एक जेसीबी, जप्त तसेच निष्कासित साहित्य वाहून नेणारे एक वाहन, एक पोलीस व्हॅन या कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.
तसेच, मुख्य डाक कार्यालयाजवळ सुमारे १२ ते १३ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयालगतच्या गल्लीत सुमारे २० परवानाप्राप्त व्यावसायिकांनी मंजूर जागेच्या पलीकडे वाढीव जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही ठिकाणीही अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करुन वाढीव जागांवरचे अतिक्रमण हटवून त्यांचे संबंधित साहित्य जप्त केले.
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…
एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे…