Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीAmravati Accident : डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले

Amravati Accident : डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले

अमरावती : भरधाव वाहनांमधून उडणाऱ्या राखेमुळे महामार्गालगत असलेल्या अनेक गावातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वाहनचालकांच्या डोळ्यात ही केमिकलयुक्त राख शिरत असल्याने अपघाताची शक्यता आहे असे असतांनाही या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे मंगळवारी एका २८ वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले. नांदगाव पेठ बस स्टॅन्ड वर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाहनातील राख हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात शिरल्यामुळे अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ऋषिकेश सुभाष निंभोरकर (२८) रा. नांदुरा बु.हा युवक जागीच ठार झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी शवागृहासमोर आक्रोश करत राखेच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी ही मागणी रेटून धरत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,ऋषिकेश निंभोरकर हा बिझिलँड येथील एटीएम वर कार्यरत होता. मंगळवारी दुपारी आपले कर्तव्य बजावून दीड वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ वरून नांदुरा बु येथे जात असतांना विरुद्ध दिशेने येत असलेल्या हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात भरधाव वाहनातील राख उडाल्यामुळे हार्वेस्टर चालकाचे संतुलन बिघडले आणि समोरून येणाऱ्या ऋषिकेशच्या वाहनाला अनियंत्रित हार्वेस्टरने जबर धडक दिली. या अपघातात ऋषिकेश जागीच ठार झाला तर हार्वेस्टर चालकाने तेथून पोबारा केला.

कुर्ला, पवई, बोरिवली येथील ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय

घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी हार्वेस्टर चालकाला ताब्यात घेतले आणि ऋषिकेशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी शवागृहासमोर आक्रोश करत मृतदेह उचलण्यास मनाई केली. ऋषिकेश हा प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता असल्याने प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू व प्रहार कार्यकर्ते शवागृहाजवळ पोहचले. छोटू महाराज वसू यांनी कुटुंबीयांचा आक्रोश बघताच पोलीस आयुक्त यांना भेटून रतन इंडिया मधून येणाऱ्या राखेच्या वाहनांवर प्रशासन का कार्यवाही करत नाही असा सवाल उपस्थित केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,उपायुक्त सागर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तसेच मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी छोटू महाराज वसू व कुटुंबियांना विश्वासात घेऊन या संदर्भात पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. व त्यानंतर लगेच प्रादेशिक परिवहन विभागाचे मो वा नि. निलेश दहेकर, पल्लवी दौड, स.मो. वा.नि. निलेश जाधव, कांचन जाधव, नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प या कंपनीवर तसेच राखेच्या वाहनांवर योग्य ती कार्यवाही करून मृतक ऋषिकेशला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी पत्र मृतकाच्या कुटुंबियांना दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी ऋषिकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन नांदुरा बु येथील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू वसु महाराज, प्रशांत शिरभाते, इमरान शहाल,नितीन शिरभाते, सचिन महल्ले, मयूर निंभोरकर, ऋषिकेश पंचवटी, गजानन भूगूंल, चंदू खेडकर, विशुद्ध जंवजाळ, निलेश पानसे, चंदू उगले व नांदुरा बुद्रुक येथील गावकरी उपस्थित होते.

वृद्ध वडिलांचा आधार होता ऋषिकेश

ऋषिकेशच्या आईचे निधन झाल्यामुळे ऋषिकेश आणि त्याचे वृद्ध वडील हे दोघेच राहत होते. ऋषीकेश हा वडिलांचा एकुलता एक आधार होता. आपली नोकरी सांभाळून आपल्या वडिलांचा सांभाळ तो करत होता.मात्र तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे वृद्ध वडिलांचा आधार हिरावला गेला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -