Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

CSK vs PBKS, IPL 2025 : चेन्नईला धावांचा पाठलाग करायला जमेल का?

CSK vs PBKS, IPL 2025 : चेन्नईला धावांचा पाठलाग करायला जमेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नईच्या संघाची पराजयाची शृंखला काही तुटत नाही. मागील चार सामन्यापैकी तीन सामने चेन्नईने गमावले आहेत. तिन्ही सामन्यात चेन्नईचा धावांचा पाठलाग करताना पराजय झालेला आहे. चेन्नईच्या फलंदाजाकडे सातत्य नाही आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चारपैकी दोन सामने खेळला व दोन सामन्यात लवकर बाद झाला. रचिन रवींद्र पहिले दोन सामने खेळला व उर्वरित दोन सामन्यात लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठीने तर सुरुवातीचे तिन्ही सामने मिळून २३ धावा केल्या, फक्त गेल्या सामन्यात तो खेळला.

आता पर्यंत सर्वच सामन्यात एखादा खेळाडू चांगला खेळतो व बाकी सर्व १५-२० धावा काढून बाद होतात आणि म्हणून चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरतो. आज चेन्नईला जास्ती जास्त धावा कशा होतील या कडे लक्ष द्यावे लागेल. धावांचा पाठलाग करण्याकरिता संघामध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. चांगल्या फिनिशरची चेन्नईला गरज आहे.

चेन्नईचा सामना आज होणार आहे पंजाबशी, ज्यांनी आता पर्यंत दोन सामने जिंकले आहेत व एक सामना गमावला आहे. पंजाबचा संघ चेन्नई संघा पेक्षा फलंदाजी मध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. पंजाबला गेल्या सामन्यातील चुका ह्या सामन्यात भरून काढव्या लागतील.

आजचा सामना पंजाब घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्यांना थोडे दडपण येऊ शकते. चला तर बघूया चंदिगढच मैदान कोणाला साथ देते.

Comments
Add Comment