Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे २१०० कडे लक्ष! 'या' तारखेपर्यंत मिळणार एप्रिलचा हप्ता

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना'अंतर्गत (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने रक्कम वाढवून २१०० करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याकडे लक्ष लागले असून यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, अशी माहिती समोर येत आहे. परंतु अद्यापही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)



लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार?


महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी