Sikandar Box Office Collection : सलमान खानचा सिकंदर पोहोचला १०० कोटींच्या घरात!

  98

मुंबई : दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खान (Salman Khan) नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस घेऊन येतो. यंदाही ३० मार्च रोजी सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar) हा चित्रपट प्रदर्शित केला होता. सुरुवातीला या चित्रपटाबाबत प्रेक्षकांचे मतमतांतरे होत होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार का असा प्रश्न पडला होता. परंतु आता अखेर सलमान खानचा सिकंदर चित्रपट कोटी रुपयांच्या घरी पोहोचला आहे. (Sikandar Box Office Collection)



सलमान खान चित्रपट चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, बॉक्स ऑफिसच्या कलेक्शननुसार सिकंदरने रिलीजच्या आठव्या दिवशी भारतात १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आज सिकंदरने ४.५० कोटी रुपये कमावले आहेत. त्यानुसार आठ दिवसांचा एकूण गल्ला १०२.२५ कोटींवर पोहोचला आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली. सिकंदरने २६ कोटींवर सुरुवात केली, जी छावाच्या ₹३१ कोटी कमाईपेक्षा खूपच कमी होती. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, सिकंदरने ९०.२५ कोटी कमावले.


दरम्यान, 'सिकंदर' जगभरातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत आहे. 'सिकंदर'च्या निर्मिती संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने सात दिवसांच्या कालावधीत जगभरात १८७.८४ कोटींची कमाई केली. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित, सिकंदर हा एक ॲक्शन-थ्रिलर आहे ज्यामध्ये सलमान खान, रश्मिका मंदान्ना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा